अधीर अवखळ अन् उत्सुक किती कोऱ्या पानी चटकन उतरली.. एकटीच.. मधुमालती.. न संदर्भ काही.. न प्रस्तावना ती.. वेली सख्यांना सोडून आली.. मुक्त छंद.. मधुमालती.. सुबक पाकळ्या नाजूक देठी.. पराग अंतरी जपून आली.. धिटूकली.. मधुमालती.. अधीर कल्पना शब्द पाकळ्या भावार्थांचे चे पराग गर्भी.. प्रतिभेच्या देठात उमलली, कविता की ती.. मधुमालती..? ~ कल्याणी (निकिता) रात्री ११:४५, १६-१०-२०२४
| ![]() |
Thursday, 17 October 2024
मधुमालती
Friday, 18 June 2021
चित्र कविता - ५
वाट अडवली जेंव्हा..
गती थांबली थांबली,
जणू धरेचीच तेंव्हा..
भूत भविष्याचीही,
सूत्रे त्याच्याच हातात..
गेले नि:शंक मनी मी,
कृष्ण बाहूंच्या पाशात ..
~* कल्याणी *~
१४/०६/२०२१
१:०० दुपारी
Wednesday, 12 February 2020
चित्र कविता-४
चढणारी रात्र, उतरता प्रकाश; विझत चाललेल्या मेणबत्तीचा..
पुन्हा तल्लफ लावणारा गंध कपातून, संपलेल्या कॉफीचा.. आणि मनाचा हट्ट .. डायरीची नेमकी ' तीच ' पाने वाचण्याचा.. आता रात्र चढत जाणार, मेणबत्त्या विझत जाणार, कॉफीच्या कपांची रांग लागणार.. आणि कुठेतरी पहाटे क्षितिजावर गुलाबी छटा उमटली.. डायरी मधल्या ' त्या ' पानातल्या आठवणींसारखी.. की धांदल उडणार.. रात्रीचा पसारा आवरताना.. माझी आणि मनाची.. ~* कल्याणी *~ १२/२/२०२० पहाटे १३:२० |
Tuesday, 10 December 2019
चित्र कविता -३
Monday, 21 January 2019
चित्रकविता-२
Wednesday, 27 June 2018
चित्रकविता-१
पसरून बाहू
दिर्घ श्वास अन्,
केश मुक्त ते
डोळे मिटून,
एकरुप तू होऊ पाहशी..
न्हाऊन हिरवे वस्त्र लेउनी,
नीलाकाशी मुक्त सोडल्या,
खग केशांच्या वनराणीशी.
वर्षाघन तव उ:श्वासान्नी,
मोहरुन मग झरझर झरतील..
जल बिंदुंचा शृंगार लेऊनी,
ओलेती तू की वनराणी;
प्रश्न कठिण हा सोडवताना
मंत्रमुग्ध मी अनिमिष नयनी
रूप तुझे हे साठवताना,
कवितेतून तव चित्र रेखतो...
- कल्याणी (२७/६/२०१८ स.११:४५)
दिर्घ श्वास अन्,
केश मुक्त ते
डोळे मिटून,
एकरुप तू होऊ पाहशी..
न्हाऊन हिरवे वस्त्र लेउनी,
नीलाकाशी मुक्त सोडल्या,
खग केशांच्या वनराणीशी.
वर्षाघन तव उ:श्वासान्नी,
मोहरुन मग झरझर झरतील..
जल बिंदुंचा शृंगार लेऊनी,
ओलेती तू की वनराणी;
प्रश्न कठिण हा सोडवताना
मंत्रमुग्ध मी अनिमिष नयनी
रूप तुझे हे साठवताना,
कवितेतून तव चित्र रेखतो...
- कल्याणी (२७/६/२०१८ स.११:४५)
Subscribe to:
Posts (Atom)






