Showing posts with label vishva. Show all posts
Showing posts with label vishva. Show all posts

Sunday, 12 August 2012

उलथा-पालथ



माझ्या भिंती माझंच घर 
माझं प्रेम माझेच जन 
माझी जखम मझाच सल
माझ्या माझ्यात घुसमटणारं 
माझंच मन.. माझंच मन..

माझं सुख माझं विश्व
नको कुणाची ओंगळ सोबत 
मी एकला माझंच सर्वस्व 
मी पणाला मिरवणारं
माझंच मन.. माझंच मन..

एक क्षण मग अवचित येतो
माझ्या विश्वात वादळ होऊन 
अहं पणाच्या भिंती तोडून 
लाचार होतं मग ..
माझंच मन.. माझंच मन.. !
- कल्याणी