Tuesday, 6 December 2011

Vasantdehi


First post on my blog.. :) 

Background: imagine a beautiful girl just came out of bath with wet hair and all..
And mirror is praising her beauty.. :)

वसंत देही

मनी लाजुनी दर्पण तिजला
पुन्हा पुन्हा निरखतो..
वसंत देही तो ओलेती
मृदुस्वरे वर्णितो ..

सुवर्णस्पर्धी सुंदर कांती
जलबिंदूंचे  त्यावरी मोती..
मेघांहूनही कुंतल गहिरे
मोतीहार त्यांवरही सजती..
सुगंध मादक तिचा तनुचा
निवांत आस्वदितो ..

गुलबाक्षिसम अधर गुलाबी
गीत अमिटसे गुणगुणताना..
कंकण किणकिण लयीत करिती
कचभारा ती सावरताना..
खट्याळ वायू तिच्या बटांना
पुन्हा पुन्हा विस्कटतो..